मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या दुर्दैवी अपघातात आग्रे कुटुंबीयांसह त्यांच्या अडीच वर्षांच्या चिमुकलीचाही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या दुःखद घटनेनंतर आमदार प्रमोद जठार यांनी पीडित आग्रे कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत ५० हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी चे चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, रत्नदीप देवळेकर, बूथ प्रमुख तसेच भाजपचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या भीषण अपघातामुळे संपूर्ण चिपळूण तालुक्यात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













