मंडणगड : युवासेना तालुकाध्यक्षपदी विकास पवार, मंत्री योगेश कदमांकडून अभिनंदन

banner 468x60

मंडणगडमधील शिंदेशिवसेना युवासेनेच्या मंडणगड तालुकाध्यक्षपदी विकास बळीराम पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून, या नियुक्तीमुळे मंडणगड तालुक्यातील युवासेनेच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

banner 728x90

युवासेना ही युवकांना पक्षाच्या विचारसरणीशी जोडणारी महत्त्वाची संघटना असून, विकास पवार यांच्याकडे आता मंडणगड तालुक्यात पक्षाची युवक संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियुक्तीपत्रामध्ये पक्षाचे विचार, धोरणे आणि जनहिताच्या भूमिका तळागाळातील युवकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबरोबरच गावागावात युवासेनेचे जाळे अधिक व्यापक करण्यासाठी सातत्याने कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पक्षवाढीसाठी समर्पितपणे काम करण्याचे आवाहनही नियुक्तीपत्रात करण्यात आले आहे. युवकांना संघटित करून सामाजिक आणि जनहिताच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यावर भर देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, विकास पवार यांच्या नियुक्तीनंतर राज्याचे मंत्री योगेश कदम यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून मंडणगड तालुक्यात युवासेना अधिक सक्षम करण्यासाठी ते कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विकास पवार यांच्या नियुक्तीचे शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते आणि समर्थकांकडून स्वागत करण्यात येत असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात युवकांना पक्षाशी जोडत संघटनात्मक बळकटीसाठी ते सक्रिय भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *