Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

मंडणगड : तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा, आंबा-काजू बागायतींसह घरांचे मोठे नुकसान

banner 468x60

मंडणगड : तालुक्यात शुक्रवारी (दि. ९ मे) झालेल्या अवकाळी तुफानी वाऱ्यासह वादळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले असून झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच आंबा व काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

banner 728x90

विशेषतः कोंडगाव, दंडनगरी, पणदेरी आणि पेवे परिसरात आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झाडांवरील तयार आंबा फळे तुफानी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात गळून पडली असून अनेक झाडांच्या फांद्या मोडल्या आहेत. काही ठिकाणी काजू झाडांचेही नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वादळी पावसामुळे काही भागातील घरांवर झाडे कोसळून नुकसान झाले असून नागरिकांचेही मोठे हाल झाले आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाने संयुक्त पाहणी करून आंबा-काजू पिकांचे, मोडलेल्या झाडांचे तसेच घरांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत व शासनामार्फत नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *