मंडणगड-दापोलीत बांबू प्रकल्पाला चालना, Bio-Energy उपक्रमासाठी योगेश कदमांचे सकारात्मक मार्गदर्शन

banner 468x60

मंडणगड आणि दापोली तालुक्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन देऊन त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग, रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याबाबत राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली.

भावेश कारेकर आणि मयुरेश जालगावकर यांनी राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन मंडणगड व दापोली तालुक्यातील बांबू प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी राज्यमंत्री कदम यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अजित थोरबोले उपस्थित होते.

या भेटीदरम्यान बांबू लागवडीचा विस्तार, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या संधी, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती तसेच बांबूपासून विविध उत्पादनांची निर्मिती आणि भविष्यातील प्रक्रिया उद्योग उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली.

भावेश कारेकर यांनी बांबूपासून तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू राज्यमंत्री योगेश कदम यांना भेट म्हणून दिल्या. बांबू हे पर्यावरणपूरक पीक असून, त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबतच शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकते, यावरही यावेळी भर देण्यात आला.

दरम्यान, मंडणगड तालुक्यात Bio-Energy क्षेत्रात काम करण्याची इच्छा भावेश कारेकर यांनी व्यक्त केली. या उपक्रमाबाबत राज्यमंत्री योगेश कदम यांनी सकारात्मक मार्गदर्शन केले. तसेच अशा प्रकारच्या शाश्वत आणि रोजगारनिर्मिती करणाऱ्या उपक्रमांना भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका त्यांनी व्यक्त केली.

बांबू लागवड, शेतकऱ्यांचे उत्पन्न, स्थानिक रोजगार आणि प्रक्रिया उद्योग यांची सांगड घालून मंडणगड व दापोली तालुक्यात ग्रामीण उद्योगाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या दोन्ही तालुक्यांमध्ये बांबू आणि Bio-Energy आधारित उद्योगांच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *