मंडणगड तालुक्यातील बँक ऑफ इंडियाच्या KYC संदर्भातील APK लिंकवर क्लिक करणे मंडणगड तालुक्यातील एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले. लिंक ओपन केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 2 लाख 76 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने लंपास करण्यात आले. याप्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालेकोंड येथील सनिल धोंडू माळी (वय 47, व्यवसाय शेती) यांना 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 ते 22 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर अशोक नटे, रा. पाट, ता. मंडणगड यांच्या मोबाईल क्रमांकावरून बँक ऑफ इंडियाच्या KYC संदर्भातील APK लिंक प्राप्त झाली.
माळी यांनी सदर लिंक ओपन केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून एकूण ₹2,76,000 रक्कम ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी 26 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3.50 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 318(4) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 66(क), 66(ड) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
KYC अपडेटच्या नावाखाली आलेल्या अनोळखी APK लिंकवर क्लिक करू नये, तसेच बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती किंवा मोबाइलवरील परवानगी अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













