Breaking News
मंडणगड : खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगडमध्ये भव्य शैक्षणिक साहित्य वाटप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंडणगड शहराध्यक्ष साईराज सावंत यांच्या पुढाकाराने भव्य कार्यक्रम दापोलीत पुन्हा खळबळ POCSOचा गंभीर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलगी गर्भवती, जुलै महिन्यात दापोली तालुक्यात नोंद झालेला हा चौथा गुन्हा रत्नागिरी : महसूल विभागात मोठी खळबळ, उपजिल्हाधिकारी निलंबित, तर एकावर विभागीय चौकशीचे आदेश चिपळूणमध्ये जुगार आणि दारुबंदीविरोधात पोलिसांची धडक कारवाई, तिघांवर गुन्हे दाखल मंडणगड : बाणकोट खाडीत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला, मंडणगड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

मंडणगड : सार्वजनिक विहिरीत पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील टाकेडे गावठाणवाडी येथील सार्वजनिक विहिरीत पोहताना बुडून एका २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रज्योत प्रदिप जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना १२ मे रोजी दुपारी 2 च्या सुमारास घडली.

banner 728x90


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्योत जाधव हा त्यांच्या मुलांसोबत टाकेडे गावठाणवाडी येथील सार्वजनिक विहिरीत पोहण्यासाठी गेला होता.

पोहताना अचानक पाण्यात बुडाला. काही वेळानंतर याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत त्याला विहिरीतून बाहेर काढले, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.


या घटनेची नोंद मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. प्रज्योत जाधव हे मूळचे नालासोपारा येथील असून, सध्या ते टाकेडे येथे वास्तव्यास होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *