Breaking News
मंडणगड–वेळास मार्गावर एसटी बसची फार्महाउसच्या भिंतीला धडक, तीन महिला प्रवासी जखमी चिपळूणमध्ये भाजपचा पक्षविस्ताराचा झंझावात! मार्कंडी, शंकरवाडी, ओझरवाडीतील शेकडो तरुणांचा पक्षप्रवेश, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत तरुणांनी हाती घेतले कमळ चिपळूण : 33 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, वाशिष्ठी नदीपात्राजवळ बॅग, मोबाईल व अन्य साहित्य आढळले राजापूरमध्ये राज्य दहशतवादविरोधी पथक ATS आणि IB ची संयुक्त कारवाई , एकाच कुटुंबातील तिघांची दिवसभर चौकशी! आंतरराष्ट्रीय धार्मिक संघटनेशी संबंधित व्हॉट्सॲप समूहाच्या संपर्काचा संशय? दापोली : कै. डॉ. मोहन गुजर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 15 ऑक्टोबरला पालगड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

मंडणगड : सर्कल, तलाठी आणि लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडले, 45000 ची लाच घेताना पकडले

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडवून देणारी घटना मंडणगड येथे घडली आहे. एका कामासाठी ४५ हजार रुपयांची लाच घेताना तलाठी, सर्कल आणि लिपिक असे महसूल विभागाचे तीन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (ACB) जाळ्यात रंगेहात सापडले.

एकाच वेळी तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागातील एका कामासाठी ४५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.

ही लाच घेताना मंगळवारी (आज) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मंडणगड तहसील कार्यालयाजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिघांना रंगेहात पकडले.

यामध्ये सर्कल अमित शिगवण, तलाठी श्रीरामे आणि कोषागार कार्यालयातील शिपाई भोसले यांचा समावेश आहे. तिघांनाही ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पोलिसांची कारवाई सुरू होती. या घटनेमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *