लांजा : सामायिक जमिनीच्या वादातून विवाहितेला धमकी, गुन्हा दाखल, साटवलीत कौटुंबिक वाद विकोपाला; अश्लील हावभाव केल्याचा आरोप

banner 468x60

लांजा तालुक्यातील साटवली भंडारवाडी येथे सामायिक जमिनीच्या जुन्या वादातून एका विवाहितेला शिवीगाळ, अश्लील हावभाव तसेच धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाणे येथे एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रांजल प्रसाद चव्हाण (वय ३८) आणि संबंधित आरोपी हे नात्याने चुलत सून, सासू, सासरे व दीर आहेत. सामायिक जमिनीच्या मालकी आणि वापरावरून गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.


१६ मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रांजल चव्हाण यांच्या घरातील सर्व सदस्य अंगणात बसलेले असताना हा प्रकार घडला. तक्रारीनुसार, मारुती यशवंत चव्हाण यांना सुरेश यशवंत चव्हाण, सुनिता सुरेश चव्हाण आणि जितेंद्र सुरेश चव्हाण यांनी हाताने मारहाण केली. त्यानंतर जितेंद्र सुरेश चव्हाण यांनी प्रांजल चव्हाण यांना ढकलून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.


याचवेळी जितेंद्र चव्हाण यांनी प्रांजल चव्हाण यांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे अश्लील हावभाव केले तसेच शिवीगाळ करत “तुझ्या नवऱ्याला कसे अडकवतो बघ” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रांजल चव्हाण यांच्या तक्रारीवरून लांजा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ७९, ३५१(२) आणि ३५२ अन्वये जितेंद्र चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल नासिर नावळेकर करत आहेत.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल नासिर नावळेकर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *