Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

लांजा : तालुक्यातील पुनस गावचे सुपुत्रॲड. सूरज मोरे यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पुनस गावचे सुपुत्र आणि गेली १६ वर्षे रत्नागिरी जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करत असलेले ॲड. सूरज सदानंद मोरे यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड झाली आहे.


ग्रामीण आणि अत्यंत साध्या परिस्थितीतून पुढे येत, अथक परिश्रम, चिकाटी व निष्ठेच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. कायदाक्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहून अनेकांना न्याय मिळवून देत

त्यांनी मिळवलेली ही प्रतिष्ठित निवड ग्रामीण भागातील अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
पुनस गावासह संपूर्ण लांजा तालुक्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *