Breaking News
दापोली : बंद घरात वृद्धेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह संगमेश्वर : आंबा घाटात एसटी बस आणि एर्टिका कारची समोरासमोर धडक; पाच जण जखमी दापोली : दादा इदाते यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकाचे मुंबई लोकभवन येथे राज्यपाल जिष्णू देव शर्मा यांच्या हस्ते प्रकाशन, पद्मश्री दादा इदाते यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी प्रवास इंग्रजीतून वाचकांसमोर राजापूर-संगमेश्वरात हॉटेल रजिस्टर चोरी प्रकरण : संशयितांची गाडी जप्त, सात मोबाईल आणि नऊ रजिस्टर पोलिसांच्या ताब्यात, ‘कर्नाटक गँग’चा पर्दाफाश लांजा : जुन्या वादाचा राग मनात धरून तरुणीवर हल्ला, घरात घुसून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

लांजा : जुन्या वादाचा राग मनात धरून तरुणीवर हल्ला, घरात घुसून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

banner 468x60

लांजा लुक्यातील बौद्धवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणीला घरात घुसून मारहाण केल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकरणी तीन महिलांविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुगंधा कांबळे, सुप्रिया कांबळे आणि शुभांगी कांबळे (सर्व रा. बौद्धवाडी, लांजा, जि. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलांची नावे आहेत. सोमवार, १८ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या संदर्भात २२ वर्षीय पीडित तरुणीने लांजा पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, संबंधित तरुणी त्या दिवशी आपल्या घरात एकटीच होती. याचवेळी जुन्या वादाचा राग मनात धरून संशयित महिला तिच्या घरात जबरदस्तीने शिरल्या.


घरात प्रवेश करताच तिन्ही महिलांनी तरुणीला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच वाद विकोपाला गेला आणि त्यांनी तरुणीला जमिनीवर ढकलून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता घरातील लाकडी काठी उचलून तिच्या पाठीवर तसेच हातापायांवर जोरदार प्रहार करण्यात आले.


या मारहाणीत तरुणीला गंभीर दुखापत झाली असून तिला अंतर्गत मार लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मारहाणीमुळे घाबरलेल्या तरुणीने आरडाओरड केल्यानंतर शेजारी घटनास्थळी धावून आले. नागरिक येताना पाहून संशयित महिलांनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तेथून पळ काढला.
घटनेनंतर पीडित तरुणीने लांजा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही महिलांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *