लांजा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ १२ चाकी टाटा ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर क्लिनर गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडला.

मृत चालकाचे नाव शाम सिंग (५८, रा. सुकरताल, सहारनपूर, उत्तर प्रदेश) असे आहे. शाम सिंग हे आपल्या ताब्यातील एचआर ३८ एक्स ०९९३ क्रमांकाचा ट्रक घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने स्लायडींग घेऊन जात होते.

अंजणारी पुलाजवळ पुलाच्या अलीकडे रस्ता उताराचा असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर भरधाव ट्रक पलटी झाला. या दुर्घटनेत चालक शाम सिंग यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकमधील क्लिनर संदीप कृष्णलाल कुमार (४१, रा. विकासनगर रोड, मरवा, बेहट, सहारनपूर, उत्तर प्रदेश) यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात ट्रक तसेच त्यामधील मालाचेही मोठे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी क्लिनरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणी क्लिनर संदीप कृष्णलाल कुमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक शाम सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने व हयगयीने वाहन चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













