Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

खेड : दाऊद इब्राहिमच्या आईच्या चारही मालमत्तेचा होणार लिलाव; ‘या’ गावात उद्या लागणार बोली

banner 468x60

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) आईच्या नावे असलेल्या चार मालमत्तांचा शुक्रवारी (ता. ५) लिलाव होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुंबके इथे या चार मालमत्ता आहेत. शेतजमिनीच्या रूपात असलेल्या चारही मालमत्ता दाऊदची आई अमिना बी यांच्या नावावर आहेत. गेल्या नऊ वर्षात दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांच्या जवळपास ११ मालमत्तांचा लिलाव करण्यात आला.

तालुक्यातील मुंबके (Mumbake Village) येथील दाऊद इब्राहिम याच्या चार जागांचा लिलाव होणार आहे. जवळपास २० गुठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. चार जमिनींपैकी एका जमिनीची किंमत ९ लाख ४१ हजार २८० रुपये इतकी आहे. दुसऱ्या शेतजमिनीची अंदाजे किंमत ८ लाख ८ हजार ७७० रुपये इतकी आहे.

मुंबके येथील जमिनींच्या लिलावाबाबत २१ नोव्हेंबर २०२३ ला नोटीस काढण्यात आली होती. दाऊद इब्राहिम कास्करचे मूळ गाव हे खेड तालुक्यातील मुंबके हे आहे. या गावात त्याचा बंगला व आंब्याची बाग तर लोटे आणि खेड शहर अशा सहा ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता होत्या.

तीन वर्षांपूर्वी देखील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. खेड तालुक्यातील लोटे येथील मालमत्तेचाही लिलाव करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *