Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

खेड : कळंबणीनजीक खासगी बसला अपघात

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर खेडमधील कळंबणी गावानजीक पुण्याहून खेडला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हलर बसला बुधवारी दि. २० रोजी अपघात झाला.

ही बस महामार्गावरील ढाब्याच्या समोर महामार्गालगत खड्ड्यात उलटली. बसमधील आठ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात गंभीर जखमी झालेल्या काही प्रवाशांना अधिक उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात आले आहे. पुणे येथून खेडला हे सर्वजण येत होते, अशी माहिती मिळत आहे.

अपघाताचे वृत्त समजतात खेडमधील मदत ग्रुपचे प्रसाद गांधी व नरेंद्र महाराज संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांनी जखमींना अपघाताच्या ठिकाणाहून रुग्णालयात तातडीने हलवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *