Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

खेड : बापाने पोटच्या मुलीवर केला बलात्कार

banner 468x60

खेड मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नराधम बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची खळबळ उडवून देणारी तक्रार दाखल झाली आहे.

पिडित मुलीच्या आईने पती विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. ही घटना १४ सप्टेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत घडलेली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील एका गावात सख्ख्या मुलीवर नराधम बापाने अत्याचार केला आहे.

हा बलात्काराचा प्रकार पिडित मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने थेट पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली आहे.
पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी भादवि कलम ३७६ (२फ) व बालकांचे संरक्षण कायदा कलम ४, ६, ८ आणि १० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


तक्रार दाखल झाल्यापासून नराधम बाप घरातून बेपत्ता झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *