Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

खेड : नदी की वॉशिंग सेंटर

banner 468x60

खेड तालुक्यातील सुकिवली चोरद नदीपात्रात वाहने धुण्यासाठी वाहनचालकांनी तळ ठोकलाय. मोठ्या वाहनांसह क्रेनही नदीपात्रात धुतल्या जात असल्याने पाणी दूषित होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोक्याची टांगती तलवार कायम आहे.

मात्र तरीही प्रशासन सुस्तच असून वाहनचालकांवर कारवाईसाठी सवडच मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चोरद नदी पात्र वॉशिंग सेंटर आहे का असा प्रश्न कॉग्रेस पर्यावरण विभागाचे जिल्हाद्यक्ष किरण तायडे यांनी उपस्थित करत आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.

चोरद नदीपात्र आरक्षित करण्यात आले आहे. नातूनगर धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने चोरद नदीपात्र बारमाही वाहते असते. टंचाईग्रस्त गाव वाड्यांना याच नदीपात्रातून पाणीपुरवठा होतो.

या नदीपात्रानजीक परप्रांतीय कामगार रोजगार निमित्ताने वास्तव्यास आहेत. हे कामगार देखील याच नदीपात्रात स्नान व कपडे धुवत असतात. याशिवाय लगतच्या वस्तीतील महिलाही कपडे धुण्यासाठी येतात.

यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित होत असते. यात आता वाहने धुणाऱ्यांचीही भर पडली आहे. नदीपात्रात ट्रक,, जेसीबी, टेम्पो, रुग्णवाहिका आदी वाहने नदीपात्रात दिवसाढवळ्या व रात्रीच्या सुमारासही सर्रासपणे धुतली जात आहेत.

वाहनांमधील तेल पाण्यात मिसळून पाणीही अशुद्ध बनत आहे. चिकन विक्रेते, फळे व भाजी व्यावसायिकांच्यासह अन्य नागरिकही वाहने धुण्यासाठी नदीपात्राचाच आधार घेत आहेत. याठिकाणी वाहने धुणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करत नसल्याने

नदीपात्रात वाहने धुणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. नदीपात्रात वाहने धुवून पाणी दूषित करणाऱ्या वाहनचालकांना प्रशासनाचे अभय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारवाईसाठी प्रशासनाला सवड मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *