Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

खेड : गांजा प्रकरणी दुचाकी जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी येथील एका हॉटेलनजीक मोटारीतून २ किलो गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

गांजा विक्री प्रकरणात देखरेखीसाठी रवींद्र दत्ताराम खळे याने वापरलेली दुचाकी येथील चिपळूण तालुक्यातील वालोपे वरचीवाडी येथून हस्तगत केली.

कशेडी घाटातील एका टपरीतूनही गांजाच्या ३ ते ४ पिशव्याही येथील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आदेशानुसार, येथील पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

काही दिवसांपूर्वीच पोलिस निरीक्षक भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मोटारीतून गांजाची वाहतूक करणाऱ्या रवींद्र सहदेव जाधव (४५, रा. सिद्धार्थनगर घाटकोपर, मुंबई) याला पाठलाग जेरबंद केले होते.

त्याच्याकडून २७ हजार रुपये किंमतीचा गांजा, ५ लाखांची मोटार व अन्य साहित्य असा ५ लाख ४४ हजार २१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

या गांजा प्रकरणात चिपळूण तालुक्यातील वालोपे वरचीवाडी येथे वास्तव्यास असलेल्या रवींद्र खळे याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यालाही येथील पोलिसांनी गजाआड केले. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *