Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

खेड : ब्लॉक केल्याच्या रागातून तरुणीची बदनामी

banner 468x60

सोशल मीडियावर आपल्याला ब्लॉक केल्याच्या रागातून तरुणीचे बनावट अकाउंट काढून तिची बदनामी केल्याचा प्रकार खेडमध्ये घडला आहे.

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध खेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीला अनोळखी व्यक्तीने इन्स्टाग्राम अकाउंट ‘प्रतीक डिग्री’ या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती.

ही फ्रेंड रिक्वेस्ट तरुणीने कोणतीही खातरजमा न करता स्वीकारली. मात्र, त्यानंतर त्याने तरुणीशी ‘चॅटिंग’ सुरू केले होते. काही कालावधीनंतर हे इन्स्टाग्राम अकाउंट बनावट असल्याचे या तरुणीच्या लक्षात आले.

त्यामुळे तिने त्याला ‘ब्लॉक’ केले. त्यामुळे चिडलेल्या त्या व्यक्तीने त्याचा राग मनात धरून तरुणीच्या नावाने इन्स्टाग्रामचे बनावट अकाउंट तयार करून त्याद्वारे तरुणीचे फोटो सोशल मीडियावर टाकले.

‘तू इन्स्टाग्राम तसेच व्हॉट्सअॅपला ब्लॉक का केलेस, तू मला अनब्लॉक केले नाहीस तर मी तुझे वारंवार बनावट अकाउंट काढून तुझी बदनामी करीन’, अशी धमकीही त्याने दिली.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मेसेजमधून शिवीगाळ तरुणीने ब्लॉक केले म्हणून त्याने तिच्या मित्रमैत्रिणींना शिवीगाळीचे मेसेज करून, वारंवार वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरुन तरुणीला कॉल तसेच मेसेजही केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *