Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

मंडणगड : कुडूकखुर्द, तेरडी येथील ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

banner 468x60

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंडणगड तालुक्याचा नुकताच दौरा केला होता. यानंतर तालुक्यातील कुडूकखुर्द, तेरडी येथील ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ या संकल्पेनवर ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास वाढत असल्याने पक्षाची मानव व विश्व कल्याणाची विचारधारा व कार्यप्रणाली लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष केदार साठे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब मोरे यांच्या स्थानिक पातळीवरील नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील होते.

कुडूकखुर्द व तेरडी या दोन गावातील ग्रामस्थ विशाल मोरे, मंगेश मोरे, महेश मोरे, किशोर मोरे, राकेश कदम, सुनील धनावडे, जगन धनावडे, नितेश कदम, अजित कदम, विवेक यादव, समीर यादव, रोशन यादव यांनी १० नोव्हेंबर रोजी पक्षाच्या भिंगळोली येथील कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात पक्षाचे सदस्यपद स्वीकारत अधिकृतपणे प्रवेश केला आहे.

या कार्यक्रमास तालुका सरचिटणीस गिरिष जोशी, उपाध्यक्ष कोकाटे, आकाश नाविलकर, युवक अध्यक्ष प्रवीण कदम व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *