Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

दापोली : खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी, वृद्धाला अटक 

banner 468x60

दापोली पोलिस स्थानकाच्या हद्दीतील सोंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासीवाडी येथे छापा टाकून खवलेमांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका वृद्धाला अटक केली आहे. 

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

ही कारवाई रत्नागिरी दहशतवाद विरोधी शाखा आणिदापोली वन विभागाने १० ऑगस्ट राेजी दुपारी १:४० वाजता केली. बाळा गणपत लोंढे (८२, रा. कोर्टीवाडी, पालगड, ता. दापोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सोंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासी वाडी येथे एक जण खवले मांजराच्याखवल्यांची विक्री करिता वाहतूक करणार आहे, अशी विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली. 

या माहितीच्या आधारे रत्नागिरीच्यादहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील व पथकाने वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतरदापोली वन विभागाचे वन रक्षक गणपती महादेव जळणे यांना सोबत घेऊन छापा टाकला. 

या छाप्यामध्ये बाळा गणपत लोंढे हासोंडेघर ते मंडणगड जाणाऱ्या मार्गावरील पालगड येथील शिरखल आदिवासी फाटा येथे वन्यजीव खवले मांजराची खवलेतस्करीच्या उद्देशाने, बेकायदेशीरपणे स्वत:च्या ताब्यात बाळगून त्याची विक्री करण्यासाठी वाहतूक करताना आढळला. 

याकारवाईत ११.६७८ किलो ग्रॅम वजनाची खवले जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलिसनिरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस हवालदार राजेश भुजबळराव, उदय चांदणे, लक्ष्मण कोकरे, महेश गुरव, आशिष शेलार, सुरक्षा शाखेचे सहायक पोलिस फौजदार प्रशांत बोरकर, पोलिस हवालदार ओंकार सावंत, वन रक्षक गणपतीजळणे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *