Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

खेड : माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना जामीन मंजूर

banner 468x60

खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

त्यांच्या वतीने वकील अश्विन भोसले यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत दररोज पोलिसांना तपासकामात सहकार्य करण्याच्या अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

नगराध्यक्ष असताना नगरपालिकेच्या ठरावातील मूळ मजकुरात बदल करून महत्त्वाच्या तपशिलाव्यतिरिक्त अधिक मजकुराची नोंद घेऊन खोटा दस्तऐवज तयार केल्याचा ठपका वैभव खेडेकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *