Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

गुहागर आगारामागचे शुक्लकाष्ठ संपेना बस कधी बंद तर पंक्चर होण्याचे प्रकार

banner 468x60

गुहागर आगारामागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नसल्याचे समोर येत आहे. बोरीवलीतून गुहागरकडे येणारी ही बस

२० नोव्हेंबर रोजी सकाळी सुटली. यानंतर रामवाडीतून सुटल्यावर रस्त्यामध्येच पंक्चर झाली.

त्यामुळे प्रवाशांची सुमारे चार तास चांगलीच रखडपट्टी झाली. त्यामुळे गुहागर आगार व्यवस्थापनाविरोधात प्रवाशांनी संताप व्यक्त केला. गुहागर आगाराची बोरीवली- गुहागर बस सकाळी साडेसहा वाजता बोरीवलीतून सुटली. पावणे दहा वाजता रामवाडी बसस्थानकात आल्यावर तिथून ती ११ वाजता बाहेर पडली. ५ किलोमीटर अंतरावर आल्यावर ती मध्येच पंक्चर झाली. मध्येच पंक्चर झाल्याने प्रवाशांना विश्रांतीसाठी आजुबाजूला हॉटेल किंवा अन्य निवारा नाही उपलब्ध झाला नाही. उन्हामध्ये उभे राहून तासनतास बस दुरुस्तीसाठी वाट पहावी लागली. चार तास झाले तरी तंत्रज्ञ बस दुरुस्तीसाठी आले नव्हते. पंक्चर काढण्यासाठी बसमध्ये जॅकही नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा गुहागर आगाराच्या गलथान कारभाराचा फटका लांब पल्ल्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *