Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

खेड : जमाव करून महिलेला मारहाण 10 महिलांवर गुन्हा दाखल

banner 468x60

खेड तालुक्यातील ऐनवरे-फौजदारवाडी येथे एका महिलेला बेकायदेशीररीत्या जमाव जमवून काठीने मारहाण केल्याप्रकरणी आणि ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात 10 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


या प्रकरणी तक्रारदार रोहिणी सुभाष जाधव (वय ३५, रा. ऐनवरे-फौजदारवाडी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित संशयित महिलांनी तक्रारदार महिलेला वाळीत टाकल्याची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याच कारणावरून संशयित महिलांच्या मनात राग होता. या रागातूनच १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सर्व संशयित महिलांनी एकमेकांच्या संगनमताने बेकायदेशीर जमाव जमवला.

यावेळी त्यांनी रोहिणी जाधव यांना बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पोलिसांनी सुप्रिया सुहास जाधव, राखी राकेश जाधव, सुवर्णा सुभाष जाधव, मंगला संदीप जाधव, वनिता जाधव, अजिता अजित जाधव, सुगंधा तुळशीराम जाधव, सुमन पाडुंरंग जाधव आणि अरूणा मधुकर जाधव यांच्यासह अन्य एका महिलेवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *