Breaking News
गुहागरच्या तळवलीत बिबट्याची दहशत, शिगवणवाडीत पाळीव कुत्र्यांना बनवले भक्ष्य, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण!

खेड : दुचाकींची धडक, एक जण जखमी

banner 468x60

खेड येथील मुंबई–गोवा महामार्गावरील वेरळ येथील वाशिष्ठी डेअरी परिसरात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास दुचाकी अपघाताची घटना घडली.

या अपघातात खेड येथील राजेंद्र जगन्नाथ वाघमारे (४०) हे गंभीर जखमी झाले.

मुंबईकडून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने पुढे चाललेल्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या धडकेत दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, वेरळ येथील हा परिसर अपघातप्रवण ठरत असून वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. येथे अपघात टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *