खेड : 37 वर्षीय तरुणाची जंगलात गळफास घेऊन आत्महत्या, उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

खेड तालुक्यातील गुणंदे ते मणी जाणाऱ्या रस्त्यालगतच्या जंगलात ३७ वर्षीय तरुणाने नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. केतन विजय आंब्रे (वय ३७, रा. गुणंदे तांबडवाडी, ता. खेड) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे गुणंदे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, १७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान गुणंदे ते मणी जाणाऱ्या रस्त्यालगतच्या जंगलात केतन आंब्रे यांनी नायलॉनच्या दोरीने झाडाला गळफास लावून घेतला. काही वेळाने ही बाब नातेवाईकांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत केतन यांना खाली उतरवून उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर १८ जुलै २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास केतन आंब्रे यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.


या प्रकरणाची नोंद १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.४१ वाजता खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, मृत्यूचे नेमके कारण आणि इतर बाबींचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *