Breaking News
मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा चिपळूण : पोफळीतील पतसंस्थेत 74 लाख 27 हजारांचा कथित अपहार, अध्यक्षांसह दहा जणांवर गुन्हा चिपळूण : श्रावण मासानिमित्त विद्यार्थ्यांकडून केदारनाथ मंदिर परिसर स्वच्छता अभियान

चिपळूण : श्रावण मासानिमित्त विद्यार्थ्यांकडून केदारनाथ मंदिर परिसर स्वच्छता अभियान

banner 468x60

सावर्डे श्रावण महिन्याच्या प्रारंभानिमित्त चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील ग्रामदैवत श्री देव केदारनाथ मंदिर परिसरात गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी आणि स्वच्छतेचा संदेश दिला.

banner 728x90

या स्वच्छता अभियानात विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरासह रस्ते आणि आजूबाजूच्या भागातील कचरा, वाढलेले गवत, सुकलेली पाने तसेच इतर टाकाऊ वस्तू गोळा करून परिसर स्वच्छ केला. श्रावण महिन्यात मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असल्याने परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

या उपक्रमाला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक विशाल सुर्वे आणि अमृत कडगावे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. स्वच्छतेसोबतच सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

श्रावण महिन्यात मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना स्वच्छ आणि सुंदर वातावरण मिळावे, तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *