खेड : तालुक्यातील चिंचघर येथे घरफोडी

banner 468x60

खेड तालुक्यातील चिंचघर रेवेचीवाडी येथे अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीची काच सरकवून आत प्रवेश करत घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत चोरट्याने कपाटातील लॉकर उघडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ७६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी गणेश सखाराम सुर्वे (वय ५०, व्यवसाय-ड्रायव्हर, रा. चिंचघर, रेवेचीवाडी, ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक ०२/१२/२०२५ ते ०८/१२/२०२५ या कालावधीत सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५.०० वाजण्याच्या सुमारास घडली.

फिर्यादी गणेश सुर्वे यांच्या घराच्या बेडरुमच्या पूर्व दिशेला असलेल्या खिडकीची काच अज्ञात चोरट्याने सरकवली आणि त्यावाटे घरात प्रवेश केला.
घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने लोखंडी कपाटात साड्यांच्या कप्प्यात ठेवलेली लॉकरची चावी शोधून काढली. या चावीने लॉकर उघडून त्यातील रोख रक्कम ६,००० रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण ७६,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *