रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील NaniJ येथील जुन्या मठाजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सायंकाळी सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
प्रकाश शांताराम कांबळे (वय ४५, रा. दाभोळे बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दाभोळ परिसरातून रत्नागिरीकडे जाणारी रिक्षा (एमएच-०८ एक्यू ८८६६) महामार्गावरून जात असताना समोरील ट्रॅक्टरचे टायर अचानक फुटले. त्यामुळे चालकाने ट्रॅक्टर थांबवण्यासाठी अचानक ब्रेक लावले. याचवेळी मागून भरधाव वेगात येणारी रिक्षा थेट ट्रॅक्टरवर जाऊन आदळली.
धडक इतकी भीषण होती की रिक्षाचालक प्रकाश कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या दोन महिला प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना मोफत रुग्णवाहिका सेवेमार्फत तातडीने पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, संबंधित ट्रॅक्टर हा सुरू असलेल्या रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या कामासाठी वापरला जात असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पाली दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक Mohan Kamble यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













