गुहागर : समृद्धी सचिन जांगळी हिने 10 वी परीक्षेत 95% मार्क मिळवून शाळेत पहिली

banner 468x60

१० वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कोकण विभागाने पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवत 99.82% उत्तीर्णतेचा विक्रम केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्यी मुलींची टक्केवारी 96.14 अशी आहे.

banner 728x90

गुहागर वरचा पाट येथील समृद्धी सचिन जांगळी हिने 10 वी बोर्ड परीक्षेत 95% मार्क मिळवून पहिली आली आहे. विद्याभूषण हायस्कूल, दहिसर मुंबई येथे समृद्धी शिक्षण घेत आहे. समृद्धीच्या या यशाने शाळेचे , संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

समृद्धीने गरिबीवर मात करून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन स्वतःला यशस्वी करुन दाखवलं आहे. समृद्धी मूळची गुहागरमधील वरचा पाट येथील मात्र शिक्षणासाठी ती मुंबईमध्ये असते.

समृद्धीच्या यशामुळे सर्वच स्तरातून तिचं कौतुक होत आहे. जांगळी परिवारातर्फे देखिल तिचं मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आलं आहे. कोकण कट्टा न्यूज मार्फत समृद्धीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *