Breaking News
रत्नागिरी : ऑनलाईन बँकिंग फसवणूक करणारे भामटे गजाआड, साखरी येथील ४.८२ लाखांच्या अपहारप्रकरणी मुसक्या आवळल्या; तांत्रिक तपासाला मोठे यश रत्नागिरी : हातखंबा येथे चार वाहनांची साखळी धडक; ट्रक क्लिनर गंभीर जखमी, महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प रत्नागिरी: कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या मंडणगड : बामणघरमध्ये जमीन घोटाळा, बाप लोकांनी जमिनीच्या मालकालाच लावला चुना, “पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीचा गैरवापर, 52 एकर जमीन लाटली, 41 लाखांचा घोटाळा उघड दापोली : एसटी स्टॅन्डजवळ इको गाडीतून बेकायदा दारू वाहतूक पकडली, 2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

गुहागर : पाटपन्हाळेत सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

banner 468x60

शृंगारतळी (वार्ताहर) गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कोंडवाडी येथील तरुण विकास मंडळ तेलगडे, घाणेकर व इतर बंधू यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त श्री सत्यनारायणाची महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे.

banner 728x90

शनिवार दिनांक ३ मे रोजी दुपारी ३ वा. श्री सत्यनारायणाची महापुजा, सायं. ६.०० वा. महाआरती, सायं. ७ वा. सुस्वर भजन कीर्तने प्रासादिक भजन मंडळ कीर्तनवाडी – भागडे गट , सायं. ७ ते १० महाप्रसाद, रात्री ९ वा. सत्कार समारंभ, रात्री १०.३० वा. साई माऊली कला मंच मुंबई यांचे बहुरंगी नमन,

भक्तिमय गण श्री पात्रांनी नटलेले नटखट गवळण तसेच आई-वडिलांचे महत्त्व सांगणारे एक हृदयस्पर्शी लोकनाट्य “ व्यथा जीवनाची” असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सर्वानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तरुण विकास मंडळ तेलगडे, घाणेकर व इतर बंधू यांच्यावतीने करण्यात आले आहे.

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी गुरुवार दि. १ मे रोजी ग्रामदेवतांच्या पालख्यांचे आगमन झाले. त्या नंतर ओटी भरणे व दर्शनाचा कार्यक्रम, सायंकाळी पालखी नाचविणेचा कार्यक्रम व भव्य मिरवणूकीचा सोहळा मोठया उत्साहात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *