Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

गुहागर : झोंबडी काजळीवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये आढळला मेलेला कोल्हा, ग्रा.पं.कडून आरोग्य शिबिराचे आयोजन, विहिरीची साफसफाई

banner 468x60

गुहागर तालुक्यातील झोंबडी काजळीवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये गुरुवारी एक सडलेला कोल्हा आढळून आला. कोल्हा पाण्यात अनेक दिवस राहिल्यामुळे तो सडलेला होता आणि त्यावर जंतू निर्माण झाले होते. यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले आणि परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली, त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली.

घटना समजताच झोंबडी ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल लांजेकर, उपसरपंच प्रणाली पवार, सदस्य मयुरी लांजेकर, ग्रामसेवक गोरख सोनवणे, दिपक गायकवाड आणि आशासेविका साक्षी सरदेसाई यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने विहीरमधून मृत कोल्हा बाहेर काढला.

त्यांनी ग्रामस्थांना समजावून घेऊन सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या. विहीरमधील पाणी उपसा करून स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी शेखर भिलारे आणि कार्यकारी अभियंता दिप्ती धारप यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी सहाय्यक अभियंता गिरीश पापरकर व पवार यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले. विहिरीचे क्लोरिनेशन व पाण्याची तपासणी करून घ्यायची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आरोग्याची तातडीने काळजी घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रीम कांबळे, आरोग्य केंद्र तळवलीचे अधिकारी वैभव जाधव व मदन जानवळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांसाठी शनिवार, दि. 29 रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्याचे आश्वासन दिले. सरपंच अतुल लांजेकर यांनी नागरिकांची वैयक्तिक विचारपूस करत तातडीने उपाययोजना राबविण्याचे काम पाहिले असून, ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांमुळे गावकऱ्यांमध्ये आरोग्य धोका टळण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *