Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

गुहागर : बेपत्ता वृद्धाचा मृतदेह नऊ दिवसांनी नदीकिनारी आढळला

banner 468x60

गुहागर तालुक्यातील उंबराठ खुर्द येथील आंबेकरवाडीतून नऊ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका वृद्धाचा मृतदेह अखेर सोमवारी (१५ डिसेंबर) टाळये नदीकिनारी आढळून आला. मृतदेह संशयास्पद स्थितीत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गणपत शंकर आंबेकर (वय ७१, रा. उंबराठ खुर्द, आंबेकरवाडी, ता. गुहागर) हे दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेले होते. ते बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. त्यानंतर त्यांचे चुलत भाऊ चंद्रकांत भागोजी आंबेकर यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी गुहागर पोलीस ठाण्यात गणपत आंबेकर हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

तेव्हापासून पोलीस आणि कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते.

दरम्यान, बेपत्ता असलेल्या गणपत शंकर आंबेकर यांचा मृतदेह सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उंबराठ खुर्द, आंबेकरवाडी येथील टाळये नदीकिनारी आढळून आला. मृतदेह मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ही घटना ६ डिसेंबर ते १५ डिसेंबर या मुदतीत घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी ‘अकस्मात मृत्यू अहवाल (AMR)’ क्रमांक ४२/२०२५, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *