दापोली तालुक्यातील साखलोली येथे आज २० मे रोजी दुपारच्या सुमारास इको गाडी आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली.


मिळालेल्या माहितीनुसार, साखलोली येथील वळणाच्या रस्त्यावरून जात असताना इको गाडी आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक झाली. रस्त्यावर तीव्र टर्न असल्यामुळे चालकांचा अंदाज चुकल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.


अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













