चिपळूण : वाशिष्टी नदीपात्रात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला

banner 468x60

गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ८३ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह बहादूरशेख नाका पुलाजवळ वाशिष्टी नदीच्या पात्रात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. लक्ष्मी सिताराम झुजम (वय ८३, रा. पिंपळी बुद्रुक कुंभारवाडी, ता. चिपळूण) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला काही दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर शनिवारी बहादूरशेख नाका पुलाजवळील वाशिष्टी नदीच्या पात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

या प्रकरणाची प्राथमिक नोंद झाल्यानंतर संबंधित कागदपत्रे व पोलीस ठाणे जा.क्र. ४९२१/२०२६ अन्वयेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शनिवारी रात्री ९:५१ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आमृ. क्रमांक ११/२०२६ दाखल केला असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *