दापोलीत दुर्दैवी घटना : सार्वजनिक सभागृहाची साफसफाई करताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील आडे कोळीवाडा येथे सार्वजनिक सभागृहाची साफसफाई सुरू असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात एका ३८ वर्षीय महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पा जगदीश नांदगावकर (वय ३८, रा. आडे कोळीवाडा, ता. दापोली, जि. रत्नागिरी) या २१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी झेंडेकर मंडळाच्या सार्वजनिक सभागृहात इतर महिलांसह साफसफाईचे काम करत होत्या. यावेळी सभागृहाच्या गॅलरीत त्यांचा पाय घसरून तोल गेला. त्याचवेळी त्यांचा हात सभागृहाच्या बाजूने गेलेल्या विजेच्या मुख्य तारेला लागल्याने त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला.

घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी आंजर्ले येथील डॉ. पाटील यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे हलविण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.


या प्रकरणी रत्नागिरी आमृत्यू नोंद क्र. ५५/२०२६ अंतर्गत बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे आडे कोळीवाडा परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *