Breaking News
चिपळूण : लोटे एमआयडीसीतील प्रदूषण पुन्हा ऐरणीवर; सोनगावात पिवळे रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ, मच्छीमार संतप्त चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाची विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट, वाचन चळवळ बळकट करण्याचा निर्धार दापोली : भाटघरमध्ये शेतकरी जागृती; ‘उपयुक्त किडी’ जपा, रासायनिक फवारणी टाळा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषीकन्या’ गटाचा पुढाकार मंडणगडमध्ये बेपत्ता व्यक्तीचा जंगलात सांगाडा, गळफासासाठी वापरलेला फासही आढळला 2 महिन्यांनंतर उलगडले गूढ लांजा : हर्चे शाखा डाकघरात 8.20 लाखांचा अपहार, तत्कालीन शाखा डाकपालाविरोधात गुन्हा

दापोली : योगेश कदम आणि रामदास कदम यांनी कुटुंबासोबत केलं मतदान

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी सातपासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. दापोलीचे शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम आणि रामदास कदम यांनी मतदान केलं आहे.

banner 728x90

दापोलीत सर्वच ठिकाणी मतदानाचा उत्साह मतदारांमध्ये दिसून येत आहे. पहिल्या तासामध्ये अगदी 85 वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांची गर्दी दिसून आली. दरम्यान पूर्ण कुटुंबियांसमवेत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

आपणही सर्वांनी बाहेर पडा आणि मतदान करत आपले कर्तव्य पार पाडा आणि लोकशाहीच्या या पर्वाचा भाग व्हा! असं आवाहन योगेश कदम यांनी केलं आहे

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात १७४७ मतदान केंद्रावर मतदान सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसं संघात 13 लाख 39 हजार 697 मतदार आहेत. पुरुष – 6 लाख 46 हजार 176 तर महिला मतदार 6 लाख 93 हजार 510, रत्नागिरी,राजापूर,दापोली,गुहागर आणि चिपळूण असे पाच विधानसभा मतदार संघ आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात चार ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना तर एका ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *