Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

दापोली : एसटी बसमधून डिझेल चोरी

banner 468x60

दापोली तालुक्यातील कोंढे येथे वसतीला असलेल्या एसटी बसच्या टाकीतून सुमारे ५० लिटर डिझेलची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता दापोली-कोंढे ही एसटी बस कोंढे येथे रात्री ९.४० वाजता पोहोचली.


ही बस कोंढे येथेच रात्रीच्या वेळी थांबते. ५ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता बसचालक आशिष मळेकर यांच्या लक्षात आले की, बसच्या डिझेल टाकीचे कुलूप उघडे आहे.

तपासणी केल्यावर टाकीतून ५० लिटर डिझेल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या डिझेलची किंमत सुमारे साडेचार हजार रुपये आहे.
दापोली पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पोलीस हवालदार पवार पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *