दापोली : पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांची बदली, दापोलीचे नवे निरीक्षक महेश तोरस्कर यांनीकार्यभार सांभाळला

banner 468x60

दापोली पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून महेश महादेव तोरस्कर यांनी शनिवारी संध्याकाळी ५ वाजता पदभार स्वीकारला आहे.


महेश तोरस्कर यांना पोलीस खात्यातील २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी पनवेल शहर, कळंबोळी, मुंबई सायन, ट्रॉम्बे, तसेच क्राईम ब्रँच युनिट-६ चेंबूर येथे सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) म्हणून सहा वर्षे जबाबदारी सांभाळली आहे.

वडाळा येथे त्यांनी प्रथमच पोलीस निरीक्षक (पीआय) म्हणून काम पाहिले. तसेच रत्नागिरी आणि देवरुख येथेही त्यांचे कार्य कौतुकास्पद राहिले आहे.


दापोलीत पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना तोरस्कर यांनी सांगितले की, दापोली तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी कडक मोहीम राबवली जाणार असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *