दापोली : पालगड हार्डवेअर दुकान चोरीप्रकरणी आरोपी जेरबंद

banner 468x60

पालगड येथील पवारवाडी परिसरातील हार्डवेअर दुकान फोडून सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत अभिजित विठोबा कदम (वय ३४, रा. पालगड बेलवाडी, ता. दापोली) यांनी फिर्याद दिली होती. १२ मे २०२६ रोजी रात्री ते १३ मे रोजी सकाळी दरम्यान अज्ञात चोरट्याने हार्डवेअर दुकानाच्या पाठीमागील लोखंडी जाळी उचकटून दुकानात प्रवेश करत विविध साहित्य लंपास केले होते. चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये वायर, पाईप, थिनर, रेड्युसर, होज निपल, सिलींग फॅन तसेच २४ हजार रुपये किंमतीची सर्व्हिस वायर आदी साहित्याचा समावेश होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपी आकाश सुनील पवार (वय २४, रा. वानोशी तर्फे नातू, ता. दापोली) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस ठाणे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *