Breaking News
दापोलीतील विद्यार्थ्यांनी पोक्सो अंतर्गत आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करण्याची केली मागणी, महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांना निवेदन दापोलीकर सायकलप्रेमींची पंढरपूर सायकल वारी उत्साहात संपन्न, 300 हून अधिक किमीचा सायकल प्रवास करत विठुरायाच्या चरणी नतमस्तक चिपळूण : लावणीसाठी लवकर उठण्याच्या वादातून सुनेकडून 71 वर्षीय सासूला मारहाण; चिपळूणमध्ये गुन्हा दाखल रत्नागिरी : पेन्शन कार्ड अपडेटच्या बहाण्याने 83 वर्षीय ज्येष्ठाची 1.68 लाखांची ऑनलाइन फसवणूक खेड : गोटलवाडीत भूस्खलनाच्या धोक्याची गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून पाहणी 19 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, मृतांच्या वारसांना 8 लाख, तर घरबांधणीसाठी 2 लाख 60 हजारांची मदत

दापोली : मुरुड समुद्रकिनारी पर्यटकाचा मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील मुरुड येथे कराड येथून पर्यटनासाठी आलेल्या शशिकांत नारायण कांबळे (शनिवार पेठ, पाटण कॉलनी) या ५० वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ८:३० वाजता घडली.

banner 728x90

शशिकांत कांबळे हे त्यांचे मित्र संजय अहिवळे, अल्ताफ खान, अमित मोरे, अजिंक्य पवार, किरण पांढरपट्टे यांच्यासमवेत १६ डिसेंबर रोजी पर्यटनासाठी दापोली येथील मुरुड येथे आले.

संध्याकाळी आल्यानंतर सर्वजण मुरुड येथील रॉयल सी या हॉटेलमध्ये राहण्यासाठी थांबले. सकाळी लवकर उठून शशिकांत कांबळे, अल्ताफ खान, अमित मोरे हे हर्णे येथे मासे खरेदी करिता गेले.

तेथून आल्यानंतर हॉटेलमध्ये मासे शिजवण्याकरिता देऊन आंघोळीकरिता खोलीत गेले. त्यावेळी शशिकांत कांबळे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या समवेत असणाऱ्या मित्रांनी सांगितले.

शशिकांत कांबळे यांना तात्काळ उपचाराकरिता आसूद येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून त्यांना दापोलीमधील भागवत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून ते मृत झाल्याचे घोषित केले. कांबळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. दापोली पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत याबाबतची खबर नोंद करण्याचे काम सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *