दापोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हर्णे-वाकडी भेंड येथील एस.टी. पिकअप शेडच्या मागील बाजूस सुरू असलेल्या अवैध कल्याण मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई ७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिलीप बाळकृष्ण नवाले यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदर सत्तार महाडीक (वय ४५, रा. हर्णे बाजार मोहल्ला, ता. दापोली, जि. रत्नागिरी) हा हर्णे-वाकडी भेंड येथील एस.टी. पिकअप शेडच्या मागील बाजूस आडोशाला अवैधरित्या कल्याण मटका जुगार खेळवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपीकडे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम आढळून आली.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३४/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













