दापोली : हर्णे राणेवाडी रस्ता खचला, वाहतुकीला मोठा धोका, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका दापोली तालुक्यातील हर्णे येथील राणेवाडी रस्त्याला बसला आहे. सततच्या पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे.

banner 728x90

रस्ता खचल्यामुळे चारचाकी व दुचाकी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली असून संबंधित विभागाने रस्त्याची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *