Breaking News
राजापूरच्या नाणार खाडीतील बेपत्ता मायरा भाटकरचा शोध सुरू; कोस्टगार्डचे कमांडो, हेलिकॉप्टरसह शोधमोहीम, रत्नागिरी पोलिस दलाची युद्धपातळीवर शोधमोहीम राजापूर अल्पवयीन अत्याचार प्रकरणात मोठी कारवाई, व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी आणखी चौघांवर गुन्हा, लॉजच्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल संगमेश्वर : कोंबड्यांच्या खोलीचा दरवाजा उघडताच बिबट्याची महिलेवर झेप, मीना सुवरे यांच्या चेहऱ्याला नख लागल्याने दुखापत, वनविभागाच्या उपाययोजनांकडे ग्रामस्थांचे लक्ष संगमेश्वर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महिलांचा पुढाकार! संगमेश्वरच्या भुवडवाडीत श्रमदानातून उभारला बंधारा चिपळूण : भाजपच्या ग्रामीण तालुकाध्यक्षांचा राजीनामा, उदय घाग यांनी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्याकडे सोपविले राजीनामापत्र

दापोली : गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या 4 संशयीताविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Screenshot

banner 468x60

दापोलीत विनापरवाना गुरांची वाहनातून वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात ४ संशयीताविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली शहरातील बुरोंडी मार्गावरील लाल कट्टा परिसरात गुरांची बेकायदा वाहतूक करणारा एक टेम्पो काल (ता.२७) रोजी रात्री 8 च्या सुमारास जमावाने अडविल्याची माहिती

दापोली पोलसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून चौकशी केली असता त्यांना तेथे एमएच.०८.एपी.१५८१ क्रमांकाचा एक टेम्पो आढळून आला या टेम्पोच्या हौद्यात सुमारे साडेतीन वर्षाचा एक बैल, ७ वर्षाची एक गाय व दोन महिन्याचा एक पाडा आढळून आला. या गाडीचा चालक देवेंद्र रवींद्र झगडे, रा. गिम्हवणे

तेलीवाडी याचेकडे पोलिसांनी गुरांची वाहतूक करण्याचा परवाना आहे का याची विचारणा केली असता त्याने तो नसल्याचे सांगितले. चालकासोबत गोरखनाथ मधुकर शिंदे रा. शिरखल गाववाडी व सदानंद विठोबा जाधव, रा. शिरसोली जाधववाडी हे होते त्यांनी सदरची गुरे करजगाव येथील बागकर यांचेकडून विकत घेवून असून ती वेळवी येथील अमित अशोक मिरगल यांचेकडे विकण्यासाठी ते जात असल्याची माहिती पोलिसांना दिली.


गुरांची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात देवेंद्र रवींद्र झगडे, गोरखनाथ मधुकर शिंदे, सदानंद विठोबा जाधव व अमित अशोक मीरगल या संशयीता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक राजकुमार यादव अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *