दापोली : भाजपच्या वतीने 5 सप्टेंबरला ‘नमो दहीहंडी उत्सव’नर्सरी रोड येथे रंगणार उत्सवाचा थरार

banner 468x60

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, दापोली यांच्या वतीने ५ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य ‘नमो दहीहंडी उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. दापोली येथील नर्सरी रोड येथे दुपारी ३ वाजल्यापासून हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळ संस्कृतीच्या आठवणी जागविण्यासोबतच पारंपरिक उत्साह, आनंद आणि सामाजिक एकोपा जपण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचत थरारक प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.

उत्सवाच्या निमित्ताने परिसरात उत्सवी वातावरण निर्माण होणार असून, नागरिक, युवक आणि गोविंदा पथकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळणार आहे. दापोलीकर नागरिकांनी आपल्या परिवारासह या उत्सवात सहभागी होऊन श्रीकृष्णाच्या गोकुळ संस्कृतीचा आनंद लुटावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

कार्यक्रमस्थळ : नर्सरी रोड, दापोली
दिनांक : ५ सप्टेंबर २०२६
वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून
आयोजक : भारतीय जनता पार्टी, दापोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *