दापोली : आंजर्ले आणि केळशी समुद्रकिनारी आढळले दोन मृतदेह

banner 468x60

दापोली तालुक्यातील आंजर्ले आणि केळशी समुद्रकिनारी दोन मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आज सकाळी आंजर्ले समुद्रकिनारी 1 आणि केळशी समुद्रकिनारी 1 असे 2 मृतदेह सापडले असल्याने परिसरात भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

banner 728x90

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गावातील स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले असून मृतांची ओळख पटविण्याचं काम पोलिसांकडुन सुरू आहे. मात्र हे मृतदेह कुठून आले आहेत किंवा कसे आलेत याबाबत ठोस माहिती समोर आली नाही.

सध्या पोलिसांसमोर हेच आव्हान आहे की मृतदेहाची ओळख पटवणं आणि या घटनेचा उलघडा लावणं दरम्यान गावतील स्थानिक नागरिकांसोबत बातचीत करून पोलिसांचं सध्या ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.


(ही बातमी आम्ही आताच ब्रेक केली असून याबाबतची सविस्तर माहिती कोकण कट्टा न्यूजच्या वेबसाईटवर आणि युट्यूबवर अपडेट होत राहिल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *