दापोली येथील अलोक मोरे हा १२ वर्षीय मुलगा शुक्रवार, दिनांक १६ मे २०२६ रोजी सकाळपासून बेपत्ता झाला असून, त्याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. अलोक अचानक घरातून निघून गेल्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र उशिरापर्यंत त्याचा शोध लागू शकला नाही. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनीही विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच या प्रकरणाची माहिती दापोली पोलीस स्टेशनला देण्यात आली असून, पोलिसांकडूनही शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.
अलोक मोरे याला कोणी कुठेही पाहिले असल्यास अथवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ दापोली पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.
📞 संपर्क क्रमांक : ८९८३०८९०७२
नागरिकांनी मुलाच्या शोधासाठी सहकार्य करावे तसेच कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित संपर्क साधून मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













