दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे पंचनदी आणि गुरववाडी, वडवाडी, देऊळवाडी, बौद्धवाडी, बारेवाडी, काजुवाडी आणि भरणेवाडी या वाड्यांमध्ये मागील सात ते आठ दिवसांपासून नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
पिण्याचे पाणी तसेच दैनंदिन गरजांसाठी लागणारे पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना मोठी पायपीट करावी लागत असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे विशेष हाल होत आहेत. अनेक कुटुंबांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झालेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची समस्या अधिक गंभीर बनली असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
याबाबत प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून पाणीपुरवठा खंडित होण्यामागील कारण शोधावे आणि गुरववाडी, वडवाडी, देऊळवाडी, बौद्धवाडी, बारेवाडी, काजुवाडी व भरणेवाडी येथे नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
“पाणी ही मूलभूत गरज असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा,” अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













