Breaking News
दापोलीतील विद्यार्थ्यांनी पोक्सो अंतर्गत आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करण्याची केली मागणी, महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांना निवेदन दापोलीकर सायकलप्रेमींची पंढरपूर सायकल वारी उत्साहात संपन्न, 300 हून अधिक किमीचा सायकल प्रवास करत विठुरायाच्या चरणी नतमस्तक चिपळूण : लावणीसाठी लवकर उठण्याच्या वादातून सुनेकडून 71 वर्षीय सासूला मारहाण; चिपळूणमध्ये गुन्हा दाखल रत्नागिरी : पेन्शन कार्ड अपडेटच्या बहाण्याने 83 वर्षीय ज्येष्ठाची 1.68 लाखांची ऑनलाइन फसवणूक खेड : गोटलवाडीत भूस्खलनाच्या धोक्याची गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून पाहणी 19 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, मृतांच्या वारसांना 8 लाख, तर घरबांधणीसाठी 2 लाख 60 हजारांची मदत

दाभोळ : दोन मंदिरांत भरदिवसा चोरी, 45 किलो पितळी घंटांसह सीसीटीव्ही कॅमेरा लंपास

banner 468x60

दापोली तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असून आता देवस्थानांनाही लक्ष्य केले जात आहे. दाभोळजवळील कोळथरे-गोमराई येथील चंडिकानगर परिसरातील चंडिकादेवी मंदिर आणि कालिका देवी मंदिर या दोन प्रसिद्ध मंदिरांमध्ये भरदिवसा घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

banner 728x90


११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:४५ या वेळेत अज्ञात चोरट्याने मंदिराचे दरवाजे बंद असताना आत प्रवेश करून जड वजनाच्या पितळी घंटा व सीसीटीव्ही कॅमेरा असा एकूण ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
विशेष म्हणजे चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद होऊ नये, यासाठी चोरट्याने ‘बि प्रो ८०’ कंपनीचा कॅमेरा ५६ जीबी मेमरी कार्ड व जिओ सिमकार्डसह चोरून नेला. पितळी घंटा (सुमारे २० किलो) – ₹४०,००० पितळी घंटा (सुमारे १५ किलो) – ₹३०,००० पितळी घंटा (सुमारे १० किलो) – ₹२०,००० ‘बि प्रो ८०’ सीसीटीव्ही कॅमेरा (५६ GB मेमरी कार्ड व जिओ सिमकार्डसह) – ₹६,००० एकूण मुद्देमाल – ₹९६,००० चा आहे.


या प्रकरणी फिर्यादी सुभाष भिकाजी घुबडे (वय ४६, रा. चंडिकानगर, गोमराई) यांनी दाभोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे १:५४ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५, ३३१(३) अन्वये गु.र.नं. ०९/२०२६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *