Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

दाभोळ : दाभोळ-बुरोंडी गटातून जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समिती गणासाठी नम्रता तोडणकर यांनी भरला उमेदवारी अर्ज , गृहराज्यमंत्री योगेश कदमांची उपस्थिती

banner 468x60

५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दापोली तालुक्यात आजपासून अर्ज सादरीकरणाला सुरुवात झाली आहे.

दाभोळ–बुरोंडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार नम्रता तोडणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. दाभोळ-बुरोंडी गटातून जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समिती गणासाठी नम्रता तोडणकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज सादर करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. नम्रता तोडणकर या राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. दापोली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी काळात विविध पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने दापोली तालुक्यात निवडणूक रणधुमाळीला अधिकृत सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख, छाननी प्रक्रिया व माघार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. नम्रता तोडणकर यांच्या उमेदवारीमुळे दाभोळ व दापोली परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *