दापोली शहरातील आझाद मैदान येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरुवारी, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.१५ ते ८ वाजण्याच्या दरम्यान या घटना घडल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत इंद्रभान भाऊसाहेब बर्गे (वय ४२, सध्या रा. दापोली अर्बन कॉलेजजवळ, मूळ रा. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) हा आझाद मैदान येथे देशी दारूची बाटली घेऊन मद्यपान करताना आढळून आला. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१४/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत सरोज प्रसाद मेहता (वय ५३, रा. दापोली बाजारपेठ) हा आझाद मैदान येथे बिअरची बाटली घेऊन मद्यपान करताना आढळून आला. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक २१५/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तिसऱ्या घटनेत डब्लुकुमार सुरेशकुमार मेहता (वय २८, सध्या रा. जालगाव, दापोली; मूळ रा. झारखंड) याच्याविरोधातही आझाद मैदान येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक २१६/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तिन्ही प्रकरणांत फिर्यादी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल धनाजी भास्कर देवकुळे (वय ३५), दापोली पोलीस ठाणे यांनी नोंद केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याप्रकरणी एकाच दिवशी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्याने दापोलीतील सार्वजनिक ठिकाणच्या शिस्तीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













