Breaking News
मंडणगडच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान, निवळी नदीवर बांधला बंधारा, नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा जलसंवर्धनासाठी पुढाकार दाभोळ : पंचनदी-कोळथरेसाठी रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा चिपळुण : 99 रुपयांत अस्थिविकार आणि हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, अपरांत हॉस्पिटलतर्फे आज विशेष शिबिर! चिपळूण : सावर्डेत कंटेनरचे सील तोडून औषधांचे बॉक्स लंपास, 1.64 लाखांचा माल चोरीला रत्नागिरी : पोलिसांच्या 18 QRT जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण, सागरी सुरक्षेसाठी कौशल्यवृद्धी, भाट्ये समुद्रकिनारी सात दिवसांचे प्रशिक्षण शिबिर

खेड : माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांना मातृशोक

Screenshot

banner 468x60

खेड तालुक्यातील जामगे गाव येथे माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. लिलाबाई गंगाधर कदम असे त्यांचे नाव असून, त्या गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ होती. रविवारी त्यांचे शांतपणे निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.


लिलाबाई कदम या गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच पर्यावरण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या आजी. याशिवाय हॅथवे इंटरनेटचे सदानंद कदम आणि जिल्हा परिषद, रत्नागिरीचे बांधकाम सभापती अरुण उर्फ चंद्रकांत कदम यांच्या त्या मातोश्री होत्या.


कदम कुटुंब रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.


स्थानिक ग्रामस्थांसह विविध पक्षातील नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक मान्यवरांनी जामगे येथे भेट देऊन दिवंगत लिलाबाई कदम यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, अशी प्रार्थना करत कुटुंबीयांना सांत्वन व्यक्त करण्यात आले.


दिवंगत लिलाबाई कदम यांच्या पश्चात मोठा परिवार असून, त्यांच्या निधनाने कदम कुटुंबास तसेच जामगे परिसराला मोठी हानी झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *